Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने निलेश अगसीमनी यांचा हृद्य सत्कार

Spread the love

 

बेळगाव : कुमार निलेश जोतिबा अगसीमनी हा नुसताच नेट (जे.आर.एफ.) गेट या परीक्षा नेत्रदीपक यश संपादन करून उत्तीर्ण झाला त्याबद्दल बेळगाव येथील अंनिस यांच्या वतीने निलेश अगसीमनी याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गिरीश संकुलनाच्या सभागृहात, ‘जागर विवेकाचा ‘हा कार्यक्रम झाला. यावेळी हा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा.आनंद मेणसे होते.
प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर अंनिसचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत डोपे यांनी, ‘कृत्रिम बुध्दी (AI) भविष्यय घडवणारी नवी क्रांती’ याविषयावर अभ्यासपूर्ण भाषण करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर श्रोत्यांनी कृत्रिम बुध्दिमता यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रा. प्रशांत डोपे यांनी समर्पक देऊन श्रोत्यांच्या ज्ञानात भर घातली.
यावेळी अंनिसचे उपाध्यक्ष एस. पी. चौगुले, अर्जुन चौगुले, एस. आर. पाटील, एस. जी. पाटील, डी. बी. पाटील, सुरेश भातकांडे, आर. बी. गावडे, शिवाजी हसनेकर, अर्जुन सांवगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कॉ.अनिल अजगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कॉ.कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *