Friday , March 6 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बॅ. नाथ पै व्याख्यानमाला 17 एप्रिलपासून

Spread the love

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी ‘बॅ नाथ पै व्याख्यानमाला’ कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती ती आता एप्रिल महिन्यात होणार असून त्याचे पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी गोव्याचे डॉ. साईश देशपांडे हे गुंफणार आहेत ‘गोव्यातील लोक कला- स्वरूप आणि अविष्कार’ हा त्यांचा विषय असून अतिशय मनोरंजक असे हे पहिले व्याख्यान होईल. दुसर्‍या दिवशी सोमवारी दि. 18 एप्रिल रोजी सांगलीचे ‘झी मराठी हास्य सम्राट फेम ‘अजित कुमार कोष्टी’ यांचे दुसरे पुष्प गुंफणार आहे तर तिसऱ्या दिवशी 19 एप्रिल रोजी साताराचे ‘प्रा. यशवंत पाटणे’ हे आपल्याला ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर जीवनाचे मर्म सांगतील. ही व्याख्यानमाला सार्वजनिक वाचनालयाच्या गणपत गल्ली येथील सभागृहात रोज सायंकाळी 5.30 वाजता होईल तरी आपण या तिन्ही दिवशी अगत्यपूर्वक उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनंत जांगळे : शांत, सुस्वभावी जिंदादिल व्यक्तीमत्व

Spread the love  सर्वसामान्य घरात जन्मलेली पण स्वतःच्या कर्तृत्वाने जनमानसात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *