Thursday , December 11 2025
Breaking News

संतोष आत्महत्या प्रकरण; सात पथके कर्नाटकाच्या विविध भागात

Spread the love

एडीजीपी प्रताप रेड्डी; पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न
बंगळूर : अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) (कायदा व सुव्यवस्था) प्रताप रेड्डी शनिवारी उडुपी येथे आले. त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कथित आत्महत्या प्रकरणी तीन तास बैठक घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत तपास पथकांचा भाग असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सकाळी ९-३० वाजता सुरू झालेली बैठक दुपारी १२-३० पर्यंत चालली होती.
नंतर पत्रकारांशी बोलताना प्रताप रेड्डी म्हणाले की, मी उडुपी येथे आलो आणि संतोष पाटीलच्या कथित आत्महत्या प्रकरणातील तपास पथकांना निर्देश देण्यासाठी विशेष बैठक घेतली. पुरावे गोळा करण्यासाठी सात पथके राज्याच्या विविध भागात रवाना झाली आहेत.
फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) अहवाल स्वतंत्र संस्थेद्वारे पोलिसांना दिला जाईल, तथापि, आम्ही प्रक्रिया जलद करण्यास सांगू, असे ते म्हणाले.
हे आत्महत्येचे प्रकरण म्हणून निष्कर्ष काढण्यासाठी पुष्टीकारक पुरावे पुरेसे आहेत का, असे विचारले असता, पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, सर्व पैलूंची छाननी केली जात आहे. विविध आयामांचा विचार करून तपास व्हायला हवा.
सूत्रांनी सांगितले की तपास पथकाला प्रथमदर्शनी कंत्राटदार संतोष पाटील यांनी माजी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना थेट फोन केल्याचे आढळले नाही. पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर यांना ईश्वरप्पा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. पाटील यांचे दोन मित्र संतोष मेडप्पा आणि प्रशांत शेट्टी यांना ११ एप्रिल रोजी उडुपीला येण्यापूर्वी त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी चिक्कमंगळूरला नेले आहे.
विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे, मात्र विष प्राशन कोणत्या परिस्थितीत झाले याचा तपास सुरू आहे. लॉज रूममध्ये संतोष पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले मोनोक्रोटोफॉस कीटकनाशक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीसी टीव्ही फुटेज ताब्यात
ज्या हॉटेलमध्ये संतोषचा मृत्यू झाला होता, त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, संतोषने आत्महत्या केलेल्या शांभवी लॉजचे व्यवस्थापक दिनेश यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दोन खोल्या स्वत:च्या नावावर बुक केल्या होत्या. त्यांनी त्यांचा हिंडलगा येथील पत्ता दिला होता. मेडप्पा आणि शेट्टी एका खोलीत, तर संतोष पाटील यांनी दुसरी खोली घेतली. चेक इन करून ते जेवायला गेले आणि रात्री ८.५९ ला परतले. संतोष पाटील हा एका कव्हरमध्ये ज्यूस घेऊन जात होता, असे दिनेश यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०-५० वाजता, त्याचे मित्र लॉजच्या रिसेप्शनवर आले आणि त्यांनी संतोषची चौकशी केली, त्यांनी सांगितले की, त्याची २०७ क्रमांकाची खोली कुलूपबंद आहे आणि तो त्यांच्या फोनला उत्तर देत नाही. त्यानंतर एका खोलीतील मुलाने सुट्या चावीने दरवाजा उघडला असता त्यांना संतोष झोपलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. आम्ही ताबडतोब पोलिसांना कळवले, असे दिनेश म्हणाला.
दरम्यान, संतोष पाटीलचा शोध घेत पोलीस सकाळीच लॉजवर पोहोचले होते. त्यांनी त्याचा फोटो दाखवला होता पण दिनेशला पोलिसांनी दिलेला पत्ता बेळगावचा असल्याने त्याला ओळखता येत नव्हते.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे काढून घेतले असून दोन्ही खोल्या आठवडाभरासाठी भाड्याने देऊ नयेत, असे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *