Friday , March 6 2026
Breaking News

बेळगावात जायंट्स भवनासाठी भरीव मदत करू

Spread the love

आमदार अभय पाटील यांचे आश्वासन

बेळगाव : बेळगावातील सामाजिक कार्यात जायंट्स सेवाभावी संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे. संस्थेच्या वाटचालीला माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत. बेळगावातील जायंट्स भवनासाठी आमदार फंडातून भरीव मदत करू, असे आश्वासन आमदार अभय पाटील यांनी दिले आहे.
जायंट्स ग्रुप बेळगाव मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार अभय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जायंट्स मेनचे मावळते अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात, जायंट्स फेडरेशनचे अध्यक्ष तारादेवी वाली, स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर, विभागीय संचालक मदन बामणे, नूतन अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, मावळते सचिव विजय बनसुर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. श्रीमती वाली यांनी नूतन अध्यक्ष हिरेमठ यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. बामणे यांनी सर्व नुतन पदाधिकाऱ्यांना अधिकार पदाची शपथ दिली. उपाध्यक्ष सुनील भुतेकर यांनी स्वागत केले. यल्लापा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव मुकुंद महागावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला जायंट्सचे आजी माजी सदस्य व हितचिंतक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *