Thursday , September 19 2024
Breaking News

मराठीच्या अस्मितेसाठी साहित्यिकांनी आता लेखणी उचलायला हवी : माजी महापौर शिवाजी सुंठकर

Spread the love

प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन यशस्वी करण्यासाठी पाठिंबा : खानापूर, जांबोटी, चंदगड, निपाणी, बाची, तुरमुरी, बेळगुंदी, सांबरा, उचगाव, कडोली, निलजी, मुतगा, कंग्राळी बीके, कंग्राळी के एच, खानापूर, काकती होनगा, कावळेवाडी जागृती

बेळगांव  : भाषा हा माणसाचा आत्मा असून तो समाजापासून वेगळा करता येत नाही. साहित्य माणसाला सहित शिकविते. समाजातील कोणताही बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन नव्हे तर सामाजिक कृतींचे व आंतरक्रियांचे क्रियांचे आकृतिबंध मुल्ये, संस्कृती फलिते आणि प्रतीके या अविष्कारांसह होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन म्हणता येईल. साहित्याने समाजाच्या संबंधाची सतत चर्चा होत असते आणि साहित्य समाजापासून तुटत असल्याचा एक सूर निघत असतो; ही पोकळी भरून काढण्यासाठी नव्या लेखकांनी नव्या दमाचे लेखन समाजामधील असलेले वास्तविकतेची दाहक त्यांच्या साहित्यातून मांडण्याची आज गरज निर्माण झाली आहे. समाजामध्ये पसरलेली विषमता दूर करण्यासाठी लेखकांनी आता लेखणी हाती घेऊन परिवर्तनाची पहाट निर्माण करायला पाहिजेत. विषमतेने भरलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम साहित्यातून केले गेले पाहिजेत. मराठी साहित्य काळाबरोबर धावत नाही किंवा नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी साहित्य निर्मितीसाठी नव्या पिढीतील लेखक कवीने समाजाला तल्या विसंगतीचे परिवर्तन करून आणण्यासाठी लेखन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसांच्या जगण्यातील जीवन-मरणाच्या संबंधातील प्रश्नावर ती लेखन करून समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृती करून विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजचं जग कलांच्या पेक्षा नेहमीच वेगळं असतं उद्याच्या जगात भविष्य आपण सांगू शकत नसलो तरी त्यांचा वेध घेऊ शकतो त्याला सामोरं जाण्यासाठी चाकोरीबाहेरचा विचार करण्याची ताकद साहित्यात आहे आणि तीच समाजाला देत राहते साहित्यातून समाजातील विसंगती आणि विषय सेवांचे भरलेले चौक या याचा परिणाम माणूस दिवसेंदिवस बघत राहतो आणि सुख दुःखाचा कचाटयात सापडुन आपलं जीवन विरहात घालवतो. संघर्ष हेच जीवन सुंदर करण्यासाठी मिळाली ही संधी आहे; त्यामुळे नव्या लेखक, कवी कवयित्री यांनी जागृती करून देशातील विविध क्षेत्रांचे परिवर्तन होईल असे निर्भिडपणे लेखन करावे. मराठी भाषिकांचा अस्तित्वाचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतो आज वेळोवेळी आम्ही लढत आहोत. मराठी भाषा संस्कृती परंपरा शाळा-महाविद्यालयातील विविध उपक्रमातून मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणे खूप महत्त्वाचे आहे. एक थोर विचारवंत साहित्यिक आणि कवी लेखकांनी आपल्या लेखणीतून साहित्याचा जागर केलेला आहे. अनेक लेखकांनी प्राचीन काळापासून घडलेली घटना तसेच विविध लढे यशस्वी करण्यासाठी लेखक आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे अजिबात विसरून चालणार नाही. लेखनाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्रांत्या घरून आणलेल्या आहेत यांचा आदर्श आजच्या तरुण नव्या पिढीने स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे . कारण समाजामध्ये असलेल्या विसंगती दूर करण्याचे माध्यम जे चांगले शिक्षण होय. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण ये लवकर समजते. त्यामुळे त्यांच्या कळेल अशा भाषेमध्ये शिक्षण देणे खूप महत्त्वाचे असते. पण दुर्गम भागांमध्ये म्हणावे तितके दर्जाचे शिक्षण मिळत नाही ही आजची शोकांतिका आहे. दुर्गम भागामध्ये विकासाची गंगा पोचवून समाज परिवर्तन करण्याचे नवे धोरण यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण बालवयात मिळणे खूप महत्त्वाच्या असून त्या पद्धतीला योजना लागू करायला हव्यात. समाजात परिवर्तन करण्यासाठी पहिल्यांदा शिक्षणाचे महत्त्व व मातृभाषेतून घेतले जाणारे शिक्षण त्यांचे महत्त्व समजायला हवे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर ज्ञान मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. व्यक्तीची व विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि दर्जात्मक शिक्षण यांच्या परस्पर संबंधाचा मूलभूत अपने विचार केला गेला पाहिजे. इंग्रजीच्या अट्टाहासापोटी मूलभूत आपल्या मराठी भाषेला आपण अजिबात विसरून चालणार नाही इंग्रजीच्या आकर्षणापोटी त्या शाळांचे प्रमाण वाढते आहे आणि मराठी शाळांचे प्रमाण घटते आहे त्याचाच परिणाम नकळत समाजावर पडतो ते प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. प्रत्येक लढ्यात लेखकांची महत्त्वाची भूमिका त्यांच्या लेखणीतून प्रकट झाली आहे. भारतीय स्वतंत्र लढा गोवा मुक्तिसंग्राम संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर लढे यशस्वी करण्यासाठी लेखकांची महत्त्वाची भूमिका त्यांच्या लेखणीतून यशस्वीरित्या पार पडली आहे. लेखक कवी साहित्यिक विचारवंत यांचे योगदान खूप मोठे आहे; हे अजिबात विसरून चालणार नाही त्यांचा आदर्श घेऊन लेखक कवी साहित्यिक पुन्हा निर्माण व्हायला हवेत त्यांच्या लेखणीतून केलेली क्रांती पुन्हा घडायला हवी आणि नव्या पिढीने लेखणी घेऊन समाजातल्या विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रतिपादन महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले.

प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध ठिकाणी जागृती कारण्यात आली. खानापुर, जंबोटी, चंदगड, निपाणी, बाची, तुरमुरी, बेळगुंदी, सांबरा, उचगाव, कडोली, निलजी, मुतगा, कंग्राळी बीके, कंग्राळी के. एच, खानापूर, निपाणी, चंदगड, काकती, होनगा, कावळेवाडी, हलगा बस्तावड या ठिकाणी विविध बैठका घेऊन साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

खानापूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीचे अध्यक्ष बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक विशाल अशोक पाटील, समाजसेवक श्रीधर एस. पाटील, समाजसेवक पुंडलिक पावशे, निवृत्त प्राचार्य दिलीप चव्हाण, निवृत्त प्राचार्य ए. बी. मुरगोड, गिरीश कुलकर्णी, किसन सुंठकर, पत्रकार कृष्णा सेरेकर, प्रा निलेश शिंदे उपस्थित होते.

स्वागत प्रा. कृष्णा पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शंकर आप्पांना गावडा यांनी केले. यावेळी समाजसेवक विशाल अशोक पाटील, निवृत्त प्राचार्य ए. बी. मुरगोड, निवृत्त प्राचार्य दिलीप चव्हाण, प्राचार्य एम. बी. हुंदरे, समाजसेवक पुंडलीक पावशे, प्रा. निलेश शिंदे यांनी विचार मांडले.

सूत्रसंचालन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले. श्रीधर एस. पाटील यांनी आभार मानले.

यावेळी गिरीश कुलकर्णी, किसन सुंठकर, पत्रकार कृष्णा सेरेकर, एस. एस. पाटील, अजित विठ्ठल पाटील, विजय पाटील, उदय पाटील, सागर गुंजीकर, सुधीर लोहार, नारायण पाटील, नागराज पाटील, निखिल भातखंडे, परशराम कोळेकर, बी. बी. पाटील, महादेव मयेकर, श्रीधर काटे , सुनील मादार, सतीश पाटील, गोविंद पाटील यासह परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *