Saturday , October 19 2024
Breaking News

गोकाक सीपीआय, पीएसआयपासून आम्हाला संरक्षण द्या

Spread the love

बबली कुटुंबियांकडून जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

बेळगाव : गोकाक सीपीआय गोपाळ राठोड आणि पीएसआय पोलीस अधिकारी आपल्यावर अन्याय करत असून आपल्याला न्याय मिळावा आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या प्रसारमाध्यमांसमोर बबली कुटुंबियांनी आपले गाऱ्हाणे मांडले.
जून २०२१ मध्ये गोकाक तालुक्यातील महांतेश नगर परिसरात मालदिन्नी क्रॉस नजीक सायंकाळी ७ च्या सुमारास मंजू शंकर मुरुकीबावी या व्यक्तीचा संशयास्पदरित्या खून झाला होता. या खुनाशी आपल्या मुलाचा काही संबंध नाही मात्र बसप्पा रंगेनकोप्प नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून काम करत असणाऱ्या माझ्या मुलाला पोलीस स्थानकात नेण्यात आले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यासंदर्भात आपले पती विचारणा करण्यास गेले असता त्यांनाही लॉकपमध्ये घालून बेदम मारहाण करण्यात आली, अशी माहिती रायव्वा कनट्टी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
खून झालेल्या व्यक्तीचा आणि माझ्या मुलीचा संबंध असल्याचे सांगत विठ्ठल याने आपल्यावर याचिका दाखल केली. या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे पोलिसांना सांगण्यासाठी गेले असता पोलिसांनी पैशांची मागणी केली. पैशांची व्यवस्था केल्यास तुमच्या मुलांना सोडण्यात येईल असे गोकाक सीपीआय आणि पीएसनि सांगितले.
याप्रकरणी सुषमा, लक्ष्मण, मानिंग, रेणुका, रायव्वा या पाच जणांवर एफआयआर दाखल काण्यात आली असून आपल्याकडून १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना २१ जुलै २०२१ रोजी रात्री ९ वाजता पोलीस कॉन्स्टेबल गोकाक येथे ४ लाख ५० हजार, त्यानंतर चार ते पाच दिवसांनि बी एस ऑफिस हॉटेल नजीक ३ लाख आणि ५ लाख ५० हजार इतकी रक्कम सिद्दप्पा बबली यांनी अडियाप्पा, सलगन्नवर, सिद्राम हळळूरे यांच्या हातात देण्यात आली आहे. गोकाक कोर्ट सर्कल नजीक २ लाख यासह एकूण १५ लाख रुपये देण्यात आले आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्दप्पा सिद्दप्पा बबली म्हणाले, गोकाक पीएसआय आणि सीपीआय यांनी आपल्यावर हल्ला केला आहे. आपल्या मुलांना कशासाठी अटक करण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपल्यावर हल्ला करण्यात आला. आपल्यावर आणखी काही काळ मारहाण करणे सुरूच राहिले असते तर आपला जीव गेला असता, असे सांगत पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे डाग देखील बबली यांनी प्रसारमाध्यमांना दाखविले.
गोकाक सीपीआय आणि पीएसआय यांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीनंतर आपल्याला न्याय मिळावा, खून प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत सीपीआय आणि पीएसआय यांच्याकडून आपले रक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गोकाक सीपीआय आणि पीएसआय यांनी केलेल्या प्रकारची चौकशी व्हावी, त्यांच्या मागणीनुसार पैसे देण्यात येऊन देखील आपल्या मुलाची सुटका करण्यात आली नसून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी बबली कुटुंबियांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *