
बेळगाव : देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या वाढीला मदत करण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मैत्रेयी क्लबच्या अध्यक्षा मैत्रेयी बिस्वास आणि प्रमुख वक्त्या म्हणून समाजसेविका प्रमोदा हजारे तसेच उद्योजिका मधुमती देसाई या उपस्थित होत्या.
महिला सबलीकरणाला योग्य वाव देऊन, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांनी एकमेकींना सहकार्य करावे, सुरक्षेसाठी महिलांनी सक्षम झाले पाहिजे, महिला दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता गॉसिपिंग बाजूला ठेवून एकसंघ होऊन, संघटित होऊन पुढे आले पाहिजे, असे मत मैत्रेयी क्लबच्या अध्यक्षा मैत्रेयी बिश्वास यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रिया पुराणिक, नलिनी वेमुल्कर आणि महिलावर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta