
बेळगाव : बेळगावात सेवा बजावुन लोकांची मने जिंकलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती मिळाली आहे. हुबळी येथील हेस्कॉम जागृती दलाच्या एसपी पदी त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. होय, शंकर मारिहाळ यांनी यापूर्वी बेळगावात मार्केट पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर, डीवायएसपी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सध्या ते हावेरी जिल्ह्यातील हावेरी उपविभागाचे डीवायएसपी म्हणून काम पहात आहेत. आता त्यांची हुबळी येथील हेस्कॉम जागृती दलाच्या एसपी पदी त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्यपालांच्या आदेशावरून सरकारचे अधीन सचिव राजेश सुळीकेरी यांनी आदेश बजावला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta