
बेळगाव : टिळकवाडी येथील कांता अपार्टमेंटच्या वाचमनने दुचाकी चोरी झाल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गिरिश प्रभूनट्टी वय वर्षे 19 राहणार मलेट्टी-गोकाकचा सध्या रा.झाडशहापुर बेळगाव येथे वास्तव्य व प्रभूपाद बाळकृष्ण चौगुले वय वर्ष 25 राहणार बसवन कुडची अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta