Thursday , March 5 2026
Breaking News

गोकाक येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यु

Spread the love

बेळगाव : देशभरात पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढू लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे. कर्नाटक राज्यात संक्रमणाचा वेग मंदावला असला तरीही, राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील 67 वर्षीय महिलेचा आज शनिवारी घटप्रभा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण उपचार घेत आहेत. 632 जणांचा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकुण १००२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *