बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी येथील धर्मवीर संभाजी चौकात विविध मंडळांकडून विविध गडकिल्ल्यांवरुन आणल्या गेलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. नरगुंदकर भावे चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. पारंपारिक शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहर उपनगर आणि ग्रामीण परिसर शिवमय बनले आहे.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष शहर आणि परिसरात साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोना निर्बंध नसल्यामुळे यावर्षीचा शिवजयंती उत्सव मोठ्या भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. कालपासूनच अनेक मंडळांनी शिवमूर्ती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात केलेला पाहायला मिळाला. त्यानंतर आज सकाळपासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील मंडळाचे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत घेऊन बेळगावात आले. मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले.
नरगुंदकर भावे चौकातील मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी उद्यानात मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी यांच्यासह माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रणजीत चव्हाण- पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, शहापूर विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, महादेव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर, शिवानी पाटील, दत्ता जाधव, रमेश रायजादे, महेश जुवेकर, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, किरण हुद्दार, हिरालाल चव्हाण, अशोक चिंडक यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक नगरसेविका, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …