
बेळगाव : राजगोळी (ता. चंदगड) येथील एका विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल नागाप्पा पुजारी (वय 40 रा.शिवाजीनगर, बेळगुंदी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तो राजगोळी येथे गेला होता. त्यावेळी तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असण्याचा अंदाज आहे. मात्र त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उशिराने उघडकीस आली. या घटनेमुळे बेळगुंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta