Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यातील संमेलन संयोजकांना आवाहन

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविली जातात. ही संमेलने ग्रामीण भागात होत असतात. बेळगाव शहरातही संमेलन सन 2020 पासून सुरु केले आहे. यावर्षी हे ३ रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 8 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत संपन्न होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कडोली, कुद्रेमानी, बेळगुंदी, सांबरा, उचगाव, मण्णूर, माचीगड (खानापूर), कावळेवाडी, प्रगतशिल लेखक संघ बेळगाव, कारदगा (निपाणी) यासह आदी ठिकाणी ही संमेलन भरून मराठीचा जागर केला जातो. या संमेलनाचे संयोजक यांनी बेळगाव नगरीतील या संमेलनात सर्व पदाधिकारी यांच्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण व महिला कार्यकारिणी उपाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *