बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जागतिक थलसमिया दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स बेळगांव येथे भरविण्यात आले होते. जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला.
यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. यलबुर्गी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले.
रक्तदान शिबिरात जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दु, अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, सेक्रेटरी संजीवनी पाटील, राजश्री अनगोळकर, सुहास हुद्दार, माधुरी वीर, मिनल पाटील, मनाली पोटे, जायंट्स फेडरेशनचे सेन्ट्रल कमिटी सदस्य दिनकर अमीन, राजू माळवदे, श्रीधन पाटील, गणेश गुंडप, विजय खोत आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta