Thursday , March 5 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन)तर्फे उत्कृष्ट कामगारांचा सत्कार समारंभ

Spread the love

बेळगाव : प्रत्येक देशाचा कामगार मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे, तो त्या देशाचा पाठीचा कणा असतो. हा कणा जर आणखीन सदृढ करायचा असेल तर कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे राष्ट्रीय कार्य आहे, असे मत जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ यांनी आयोजित उत्कृष्ट कामगार गौरव सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केले.
व्यासपीठावर अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ, उपाध्यक्ष श्री. सुनील मुतगेकर, खजिनदार श्री. यल्लाप्पा पाटील, सचिव श्री. मुकुंद महागावकर, माजी अध्यक्ष श्री. संजय पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून वॉर्ड क्रमांक 16 चे नगरसेवक श्री. राजू भातकांडे हे उपस्थित होते.
यावेळी उद्यमबाग परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणारे सिद्धेश्वर मूकन्नावर, दत्ता रामचंद्र लोहार, श्री. मोहन परब, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये काम करणार्‍या श्रीमती गीताताई पोद्दार तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया हिंदवाडी शाखेचे कर्मचारी श्री. शंकर जाधव व शिवाजी सप्रे या कर्मचार्‍यांचा प्रमुख पाहुणे श्री. राजू भातखंडे, अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ, श्री. डॉ. विनोद गायकवाड व श्री. पी. आर. कदम यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सत्कार मूर्तींनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुणे श्री. राजू भातकांडे यांनी कामगार दिन का करावयाचा असतो व कामगार दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच याप्रसंगी दमण येथे जायंट्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शनला उपस्थित राहिलेल्या जायंट्स बंधूंचा देखील येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुसंख्येने जायंट्सचे सभासद पदाधिकारी व अन्य आमंत्रित मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव श्री. मुकुंद महागावकर यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री. सुनील मुतगेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *