Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी लढवणार

Spread the love

एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांची माहिती

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बेळगाव दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर चन्नम्मा सर्कल येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना आर. हरी म्हणाले, आगामी २०२३ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असून निवडणुकीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही आर. हरी म्हणाले.

यावेळी राज्यातील भ्रष्टाचाराच्या घटना संदर्भात बोलताना आर. हरी म्हणाले, राज्यात सरकारचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. याविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याची तयारी करण्यात येत आहे.
यावेळी अमोल देसाई, के. जी. पाटील, नारायण बसरगी, दुर्गेश मेत्री, अप्पासाहेब नायक, सुरेंद्र आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *