Wednesday , March 4 2026
Breaking News

आ. श्रीमंत पाटील यांचा ‘गुरूवंदना’ला पाठिंबा

Spread the love

बेळगाव : 15 मे रोजी शहरात होणार्‍या सकल मराठा समाजाच्या गुरूवंदना समारंभ व शोभायात्रेला माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
याबाबत आ. श्रीमंत पाटील म्हणाले की,
राज्यभरात विखुरलेला मराठा समाज आजही बहुतांशी क्षेत्रात मागासलेला आहे. शिक्षण, सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा समाजाला म्हणावे तसे स्थान मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रात आजतागायत मराठा समाजावर अन्यायच होत आलेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व भविष्यात अन्यायाचे निवारण करण्यासाठी गुरूवंदना कार्यक्रमात चर्चा केली जाईल, बेळगाव जिल्हा, उत्तर कर्नाटकासह राज्यात विखुरलेल्या मराठा समाजाचा सर्वांगिण विकास कसा होईल? याचा कृती आराखडा या ठिकाणी तयार केला जाईल. त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येने गुरूवंदना समारंभाला व या दिवशी निघणार्‍या शोभा यात्रेत सहभाग दर्शवून आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *