बेळगाव : आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त बेळगावच्या जायंट्स ग्रुप बेळगाव परिवार वतीने बुधवार दिनांक 11 मे रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्शमातांचा सन्मान करण्यात आला.
भारत नगर शहापूर लक्ष्मी रोड येथील गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जायंट्स परिवार अध्यक्ष श्रीधन मलिक, जायंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, प्रविण त्रिवेदी, पत्रकार श्रीकांत काकतीकर, हरीष दिवटे उपस्थित होते. यावेळी विमल श्रीमंत मोहीनीकर, लक्ष्मी राजाराम भादवणकर, सुनंदा हरीष दिवटे व शोभा पांडुरंग लाटुकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प आणि भेटवस्तू देऊन मातृदिन सन्मान बहाल करण्यात आला. श्रीधन मलिक यांनी यावेळी उपस्थित भारतमाता महिला मंडळाला १ हजार रुपयांची देणगी दिली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी जायंट्स प्रार्थना करण्यात आली. जायंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. श्रीकांत काकतीकर, श्रीधन मलिक, सचिन केळवेकर यांनी समयोचित विचार मांडले. शोभा लाटूकर यांनी जायंट्स कार्याचे कौतुक व्यक्त करताना, सन्माना प्रति कृतज्ञता व्यक्त केली. प्रविण त्रिवेदी यांनी आभार मानले. वैष्णवी काकतीकर हिने सुत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta