चव्हाट गल्लीतील रहिवासी संतप्त
बेळगाव : चव्हाट गल्ली येथे ड्रेनेज ड्रेनेज पाईपलाईनचे कामकाज हाती घेण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून हे कामकाज बंद पडले आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेज ड्रेनेज पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत असल्याने अनेकजण याठिकाणी पडून जखमी होत आहेत. हे कामकाज तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत चव्हाट गल्ली येथील स्थानिकांनी पालिका अधिकार्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. चव्हाट गल्ली येथे मनपाच्यावतीने ड्रेनेज ड्रेनेज पाईपलाईनचे कामकाज सुरु असून गेल्या महिन्याभरापासून हे कामकाज बंद स्थितीत आहे. पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पाय जाऊन अनेकजण पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात मनपा अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे हे कामकाज त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta