Thursday , March 5 2026
Breaking News

डॉ. सरनोबत कुटूंबियाकडून गरजू विद्यार्थ्यांला सहाय्य

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील केदार क्लिनिकचे संचालक डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील अनिकेत दळवी या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके घेण्यास आर्थिक मदत केली.

अनिकेत दळवी नुकतीच नीट परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याने बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश घेतला आहे. त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे अभ्यासची पुस्तकांसाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती त्यांनी सरनोबत यांच्याकडे केली होती. तेंव्हा समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यास नेहमीच सज्ज असणाऱ्या डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. समीर सरनोबत यांनी अनिकेत याला उत्स्फूर्तपणे 10 हजार रुपयाची मदत करताना त्या रकमेचा धनादेश त्याच्याकडे आज शुक्रवारी सुपूर्द केला.

अनिकेतने अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तम डॉक्टर व्हावे आणि समाजाची सेवा करावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *