Saturday , October 19 2024
Breaking News

मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा…

Spread the love

अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने आयोजन

बेळगाव : अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अला. डॉ. नविना शेट्टीगार, संजीवनी फौंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एकट्या राहून स्वतः कष्ट करून आपल्या मुलांचे संगोपन करत संसाराचा गाडा हाकणाऱ्या विविध पाच मातांचा अनुक्रमे भातकांडे हायस्कूलच्या सुवर्णा खन्नूकर, आई किचनच्या दीपा हनगोजी, लॅविष ब्युटीपार्लरच्या अर्चना हलगेकर, न्यू लाईफ हॉस्पिटलच्या यास्मिन अरळीकट्टी, महिला पोलीस ठाण्यातील जी. पी. मुदण्णावर यांच्या मातृत्वाचा मोठा सन्मान केला गेला. त्यांना साडी चोळी, रोपटे आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच परिचारिका दिनानिमित्त सुजाता राव, लक्ष्मी तलवार, पद्मा औशेकर, जमुना कोलकार, नागम्मा, बसव्वा, निलव्वा यांचाही प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

मंगळुरूच्या लिनेट क्रस्टा यांना त्यांच्या निराधार भटक्या प्राण्यांसाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या अनुपस्थितीत मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्वाची कामगिरी ही परिचारिका निभावत असतात, कोविड काळात तर परिचारिकांनीच फ्रंट लाईन वॉरियर म्हणून चांगले कार्य केले होते, असे गौरवोद्गार काढले. तसेच मुलांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ही आईची असते, विशेषतः जी एकटी महिला आपल्या पाल्याचा स्वबळावर सांभाळ करते तिचा हा मोठा सन्मान आहे असेही सांगितले.

डॉ. नविना शेट्टीगार यांनी स्त्रीवर जर अचानकपणे जबाबदारी पडली असेल तर ती कशी पार पाडते याबद्दल विस्तृत माहिती दिली. यावेळी संजीवनी फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी विविध नृत्ये सादर केली तसेच गायक निवृत्ती चिकोर्डे यांनी वेगवेगळी हिंदी कन्नड गीते गायली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी केले. यावेळी भाग्यश्री कालकुंद्रीकर, जेस्सी थॉमस आणि इतर अलायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *