बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक रविवार दि. 15 मे रोजी खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी हे होते. खजिनदार पोमाण्णा कुन्नूरकर यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी भरवण्यात आलेल्या भव्य आखाड्याचा जमा-खर्च सादर केला. साधक-बाधक चर्चा होऊन उपस्थित सदस्यांनी जमाखर्चास मंजुरी दिली आणि दरवर्षी भव्य कुस्ती मैदान भरविण्यात यावे यावरही सविस्तर चर्चा केली.
सदर बैठकीस नवरतन सिंग पवार, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, वाय. पी. नाईक, मल्लाप्पा हिंडलगेकर, मनोज बिर्जे, विनोद चौगले, अॅड. संतोष गडकरी, वैभव खाडे, सुजय चौगले, जयवंत दंडलकर, सुरज घाडी, हरिश्चंद्र कुन्नूरकर, विलास घाडी आदी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta