Monday , December 23 2024
Breaking News

‘सप्तपदी विवाह’तर्फे ब्राह्मण, मराठा वधू-वर मेळावा

Spread the love

बेळगाव : ‘लग्न पाहावे करून’ या उक्तीप्रमाणे आज आपल्या समाजातही लग्नाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या समीकरणांनी वधू-वर संशोधनालाही वेगळे वळण दिले आहे. वधू-वरांची शिक्षण, स्वावलंबन, जीवनशैली, त्यांचे प्राधान्यक्रम पाहता ही प्रक्रिया आधीएवढी सोपी नक्कीच राहिली नाही. वधू-वरांचे एकमेकांना येणारे नकार, पालकांची होणारी तारांबळ हे सगळे संशोधनप्रक्रियेतील वाढणारे गोंधळ कमी करायचे झाल्यास वधू-वरानी, त्यांच्या पालकांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सप्तपदी विवाह’ संस्थेमार्फत बेळगावात ब्राह्मण आणि मराठा समाजासाठी रविवार दि. 29 रोजी वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
एका छताखाली अनेक स्थळांना भेटण्यासाठी उपलब्ध करून दिलेला हा एक उपक्रम आहे. ज्याचा प्रत्येक उपवर तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. मेळाव्याचे स्थळ – सामर्थ्य मंदिर हॉल (राममंदिर), बालिका आदर्श शाळेच्या शेजारी, बुधवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. ब्राह्मण मेळावा सकाळी 9 ते दुपारी 1 आणि मराठा मेळावा दुपारी 2 ते संध्याकाळी 5. अधिक माहितीसाठी 8951852008 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *