बेळगाव : ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आज बेळगावमध्ये एसडीपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले.
ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे असून आज बेळगावमध्ये यासंदर्भात एसडीपीआय संघटनेने आंदोलन छेडले होते. यावेळी भाजप आणि आर एस एस संघटनेविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ज्ञानवापी मशिदीत कोणतेही शिवलिंग नसल्याचे सांगत हे भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एसडीपीआय बेळगाव घटकचे अध्यक्ष अमीर खान बोलताना म्हणाले, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हे शिवलिंग नसून पाण्याचे कारंजे आहेत. वाराणासी न्यायालयाने मशीद सील करण्याचे आदेश दिले असून हा आदेश आपल्याला मान्य नसल्याचे ते म्हणाले. हे भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र असल्याचा आरोपदेखील एसडीपीआय संघटनेने केला आहे.यावेळी एसडीपीआय संघटनेच्या जिल्हा घटकचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta