बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर कॉलनी येथून घरासमोर लावलेली अॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीला गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी कपिलेश्वर कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत देसुरकर यांच्या मालकीची आहे. काल मंगळवारी रात्री देसुरकर यांनी आपली अॅक्टिव्हा (क्र. केए 22 ईवाय 4449) नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर लावली होती, मात्र आज सकाळी ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेंव्हा त्यांनी आसपास चौकशी करून लागलीच पोलीस स्थानकात रितसर फिर्याद दिली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
श्रीकांत देसुरकर यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीचा रंग काळा असून कोणाला आढळून आल्यास 7411796556 किंवा 9916609987 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta