बेळगाव : तुरुंगातून शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांनी पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करावी आणि नव्या आयुष्यात समाजासमोर आदर्श बनावे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा सेवा प्राधिकरणाचे राज्याध्यक्ष बी. वीरप्पा यांनी केले.
राज्यातील विविध तुरुंगांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी करताना न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली. गुरुवारी सकाळी हिंडलगा कारागृहाला त्यांनी भेट दिली. यावेळी कारागृह कर्मचारी आणि कैद्यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने आपण सर्वांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंपाकगृहाची स्वच्छता नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावेळी कारागृह अधीक्षक कृष्णकुमार यांनी स्वयंपाकगृहाच्या नव्या खोलीसाठी अनुदान आल्याचे सांगितले. यासंदर्भात पुन्हा एक महिन्यानंतर भेट देऊन पाहणी करण्यात येईल, असे बी. वीरप्पा म्हणाले.
यावेळी न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी कैद्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य शशिधर शेट्टी, जिल्हा प्रधान आणि वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ भट, जिल्हा न्यायाधीश ए. बी. श्रीनाथ, कारागृह अधीक्षक कृष्णकुमार आदींसह अनेक अधिकारी, कारागृह कर्मचारी आणि कैदी उपस्थित होते.
Check Also
मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये अग्नीवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात….
Spread the love बेळगाव : 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्नीवीर जवानांचा शानदार …