
बेळगाव : गोव्यात प्रवासाला गेलेल्या बेळगावच्या युवकांच्या कारला झालेल्या अपघातात ३ युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना रविवारी सकाळी घडली आहे.
गोव्यात फिरायला गेलेल्या युवकांच्या कारला म्हापशाजवळ आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. म्हापशाजवळील कुचेली येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, तीन युवक जागीच ठार झाले तर अन्य एक गंभीर जखमी झाला. नयन अनगोळकर (वय 28), रोहन गडाद (वय 26) आणि सन्नी अणवेकर अशी मृत युवकांची नावे आहेत. 27 वर्षीय राहुल कारेकर हा युवक अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर म्हापशातील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हे चौघे युवक गोव्यात फिरायला गेले होते असे कळते. गोव्याहून आज सकाळी बेळगावला परतताना हा अपघात झाला. म्हापसा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta