आ. श्रीमंत पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग
अथणी : आपल्या परिसरात कुठे ना कुठे पंचकल्याण महोत्सव होत असतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने एकत्रित येण्यासाठी असे महोत्सव, समारंभ व कार्यक्रमांची गरज आहे, असे मत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
शेडबाळ (ता. कागवाड) येथेल श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने सुरू झालेल्या पंचकल्याण महोत्सवात आ. पाटील यांनी सहभाग घेतला. तिर्थंकर पूजा तसेच मुनी महाराजांचा आशिर्वाद घेतल्यानंतर ते येथे उपस्थितांना उद्देशून बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, शेडबाळ परिसरात असे महोत्सव होताना पाहून खरोखरच आनंद होतो. जगात जैन धर्माच्या तत्वांना अनन्यसाधारण महत्व आहे. अहिंसा परमोधर्म शिकवणार्या या धर्माचे सिद्धांत संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शक आहेत. यावेळी जैन समाजाचे मुनी महाराज, स्थानिक ज्येष्ठ नेते यांच्यासह श्रावक-श्राविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta