बेळगाव : येत्या दि. 1 जून रोजी हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी समस्त महिला वर्गाने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी पार पडली. दि. 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधात आंदोलनातील कार्यकर्त्यावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्या गोळीबारात झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवारी 1 सकाळी 9 वाजता सर्वांनी हुतात्मा स्मारक येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन माजी उपमहापौर व महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणु किल्लेकर यांनी केले. या बैठकीमध्ये माजी महापौर सरीता पाटील, सुधा भातकांडे, प्रिया कूडची, अर्चना देसाई, भाग्यश्री जाधव, माला जाधव, श्रध्दा मंडोळकर, राजश्री बाबुळकर, मंजुश्री कोलेकर, राजश्री बडमंजी व इतर महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta