Thursday , March 5 2026
Breaking News

हुतात्मा दिन शिवसेना गांभीर्याने पाळणार

Spread the love

बेळगाव : कन्नड सक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शिवसेना बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्यावतीने येत्या बुधवार दि. 1 जून रोजी हुतात्मा दिनी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे.

हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात बेळगाव शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक आज सोमवारी समर्थनगर बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर हे होते. सीमाप्रश्नासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर असते. या लढ्यामध्ये सक्रिय होणे हे सर्व मराठी बांधवांचे कर्तव्य आहे. मराठी युवकांना एकत्र करण्यासाठी या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करून सर्वांना एक कानमंत्र दिला आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर बैठकीत बोलताना म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत राजू कणेरी, महिपाल इतापाचे, विनायक जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबरोबरच येत्या 1 जून रोजी हुतात्मा स्मारक, हिंडलगा येथे होणाऱ्या अभिवादनाच्या कार्यक्रमास बेळगाव शहरासह सीमाभागातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *