अंकली : सौंदत्ती तालुक्यातील होसूर गावात आपल्या पत्नीच्या डोहाळजेवण समारंभास येत असताना सैनिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सैनिक प्रकाश संगोळी (वय २९) असे त्याचे नाव आहे.
याबबातची अधिक माहिती अशी की, सौंदत्ती तालुक्यातील होसूर गावातील रहिवासी व बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेल्या सैनिक प्रकाश संगोळी हे आपल्या गावी पत्नीच्या रविवारी असलेल्या डोहाळ जेवण समारंभासाठी रजा घेवून येत होते. याच दरम्यान गुरुवारी (दि. २) रोजी सायंकाळी गावी जात असताना बेळगाव येथील सुवर्णसौध जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर त्याच्या जन्मगावी होसूर तालुका सौंदत्ती येथे शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सदर घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta