बेळगाव : आर एल एस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि शास्त्री नगर येथील रहिवासी असलेल्या मयुरी बाळेकुंद्री हिने नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
तिने बागलकोट येथे पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यावेळी तिला 5000 रूपये आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
याआधीही मयुरीने वेगवेगळ्या नृत्यप्रकारात बक्षिसे मिळवली आहेत. तिने बागलकोट येथे झालेल्या स्पर्धेत चंद्रा रंगी रती रंगून ही लावणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta