
पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. संतोष काकडे उपस्थित होते.
आजच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पुढील बैठक 8 जुलैच्याआधी घेण्यात येईल. बैठकीपूर्वी सर्व साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे अंतिम करण्यात येणार आहेत. दोन वरिष्ठ वकिलांची लवकरात लवकर नेमणूक करण्यात येऊन दिल्लीत मुख्य वकील श्री. हरिष साळवे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. नकाशे तयार करण्याचं कामही महिनाभरात पूर्ण करण्यात येईल. तज्ञ समितीची पुढील बैठक दिल्लीत घेण्यात येणार आहे. बैठकीत काही काळ आमदार श्री. रोहित पवार हेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta