Monday , December 15 2025
Breaking News

पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानाचा निषेध; बेळगावात नुपूर शर्मांच्या प्रतिकृतीला गळफास

Spread the love

बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचा बेळगावात आक्रमक पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. फाशी दिलेल्या अवस्थेतील नुपूर शर्मा यांची प्रतिकृती भर चौकात वीजवाहिनीला लटकावून त्यांचा निषेध करण्यात आला.
भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत एका टीव्ही शो दरम्यान अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचे देश-परदेशात तीव्र पडसाद उमटत आहेत. मुंबईत या प्रकरणी शर्मा यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. यावरून मोठा गदारोळ उठल्यानंतर भाजपने त्यांना तसेच शर्मा यांची री ओढणार्‍या नवीन जिंदाल यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. बेळगावातही आज नुपूर शर्मा यांच्या विरोधात तोवर प्रतिक्रिया उमटली. फोर्ट रोडवरील चौकात एका वीजवाहिनीला नुपूर शर्मा यांची प्रतिकृती फाशी दिलेल्या अवस्थेत लटकावून त्यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, या घटनेचा काही हिंदू संघटनांनी निषेध केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस व पालिका अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रतिकृती हटवून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *