Saturday , December 13 2025
Breaking News

लक्ष्मण सवदी हे सुनील संक यांचे एजंट आहेत का? : आयवन डिसोजा

Spread the love

बेळगाव : काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सुनील संक यांच्याबाबत विधाने करणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी त्यांचे एजंट आहेत का असा सवाल केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा यांनी केला आहे. शुक्रवारी बेळगावातील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा म्हणाले, वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदारांनी काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार केला आहे. गेल्यावेळी भाजप उमेदवाराला निवडून दिले, मात्र अद्याप आमच्या समस्या त्यांनी सोडविल्या नाहीत असा संताप मतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सांगितले. मी स्वतः शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना भेटलो आहे. केंद्र आणि राज्य सरकारने युवकांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून झुलवत ठेवले आहे. राज्यात शिक्षकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाहीय. शिक्षकांनी पेन्शनला विरोध केला आहे. त्यांना एनपीएस लागू करून त्यांची मागणी पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप डिसोजा यांनी केला. यावेळी काँग्रेसचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., सरला सातपुते, बसवराज शिग्गीहळ्ळी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *