बेळगाव : महात्मा गांधींचे विचार पुढे नेणारे साने गुरुजी हे ज्येष्ठ विचारवंत आणि हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांचा पिंड शिक्षकाचा असला तरी ते एक उत्तम साहित्यिक, प्रभावी वक्ता, पत्रकार आणि संपादक तसेच उत्तम भाषांतरकार अश्या अनेक भूमिकेत साने गुरुजी वावरले, असे वक्तव्य स्तंभलेखक अनिल आजगांवकर यांनी काढले.
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रमात आजगांवकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. नागेश सातेरी होते.
रवींद्रनाथ टागोर यांची विश्वभारती संकल्पना साऱ्या विश्वाच्या भाषा, संस्कृती, परंपरा, कला यांचा आदर करत सर्व जग जोडण्याचा होती. हीच संकल्पना राष्ट्रीय पातळीवर अंमलात आणण्याचा साने गुरुजींचा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले, असे आजगांवकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रा. अशोक अलगोंडी, कृष्णा शहापूरकर यांनी साने गुरुजींच्या जीवनातील विविध पैलू मांडले.
रोशनी हंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात मधू पाटील, प्रा. अमोल पिंपळे, सागर मरगन्नाचे, अर्जुन सांगावकर, महेश राऊत, नितीन आनंदाचे, संदीप मुतगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta