Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात उद्या अर्धा दिवस शाळा

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योगा दिवसानिमित्त मंगळवारी कर्नाटकातील शाळांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच येत्या शनिवारी (25 जून) दिवसभर दिवस शाळा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत आहे. त्यामुळं भारत सरकारनं ‘ब्रँड इंडिया ॲट ग्लोबल स्टेज’ यावर लक्ष केंद्रित करुन देशभरातील 75 राष्ट्रीय स्तरावरच्या प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे. प्रतिष्ठित ठिकाणांवर योग प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, पंचायत राज मंत्रालयानं पंतप्रधानांकडून आलेले पत्र देखील सर्व सरपंचांना पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी योग दिन साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *