Saturday , October 19 2024
Breaking News

निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकले पाहिजे ; पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे : वन अधिकारी श्री. विनय गौडर

Spread the love

माजी विद्यार्थी संघटना, एल्गार-प्रगतिशील, दमशी मंडळ बीके-ज्योती, वायसीएमयू, जेसीयेतर्फे विषेश व्याख्यान आणि वन महोत्सव साजरा

बेळगाव : जनतेला कोरोना नंतर जागी करण्याची पुन्हा एकदा नितांत गरज आहे. अनेक घटकांमुळे जगभरात बदल घडून आले हे समजून घेऊन वागायला हवे. निसर्गाचा ऱ्हास झाल्यास मानवाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही यासाठी आज पर्यावरण निसर्गाच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण निसर्गाशी एकरूप होत नाही तोपर्यंत निसर्गाच्या व्यथा कळणार नाहीत. जंगल संवर्धन होणे काळाची गरज आहे. पृथ्वीवर सूक्ष्मजीव कीटक आणि प्राण्यांच्या; एकूणच सजीवांच्या आठ दशलक्ष पेक्षा जास्त प्रजाती असतील; अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत आहे. मानवाच्या अतिक्रमणामुळे हजारो प्रजाती नष्ट होत आहेत ते जतन करून विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचे वन अधिकारी विनय गौडर यांनी “पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन – बदलता काळ आणि जबाबदारी : एक चिंतन” या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव, एल्गार सामाजिक साहित्य परिषद, द. म. शि. मंडळ माजी विद्यार्थी संघटना बी. के. ज्योती कॉलेज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बेळगाव चंदगड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आणि वन महोत्सव शनिवार दिनांक 11 जून 2022 रोजी महाविद्यालयाच्या मारुतीराव काकतकर जिमखाना सभागृहात मोठ्या थाटात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार होते. प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव उपविभाग वन अधिकारी श्री. विनय गौडर व श्री. दिनकर कांबळे उपस्थित होते.

व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत बेळगाव जिल्हा वनाधिकारी श्री. सुभाष शेरखाने, मल्लिकार्जुन ज्योतेन्नावर, महंमद किल्लेदार, सिद्धार्थ चलवादी, प्रवीण बेटगिरी, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्रा डॉ. डी. एन. मिसाळे, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. वाय. एस. केसरकर, प्रा. एन. एम. शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. एस. एन. पाटील, प्रा.डॉ. आर. डी. शेलार, प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी विचार मांडले. यावेळी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला; झाडे जगविण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने काम पार पाडले पाहिजे हे सांगण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या आणि प्रत्येकांच्या महत्वाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

स्वागत प्रा. राजाराम हालगेकर, प्रास्ताविक प्रा. निलेश शिंदे, परिचय प्रा. एस. एस. काकतकर व प्रा. सि.जी. बिरादार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. महेश जाधव व प्रा. डॉ. एम . व्ही. शिंदे यांनी केले तर प्रा. महादेव नार्वेकर यांनी आभार मानले.

यावेळी प्रा. नितीन घोरपडे, प्रा. डी. ए. निंबाळकर, प्रा. लक्ष्मी कंग्राळकर, प्रा. विजयश्री चव्हाण, प्रा. डॉ. अमित चिंगळी, प्रा. नारायण तोऱ्यालकर, प्रा संजय बंड, प्रा. राघवेंद्र मलवाडकर, प्रा लक्ष्मण बांडगे, आनंद गोरल, चंद्रशेखर गायकवाड, उदय पाटील, पी.एस. बिर्जे, सुधीर लोहार, सागर गुंजीकर, नारायण पाटील, अनिल पाटील, श्रीधर पाटील, अजित पाटील, विजय पाटील, नामदेव सुनगार, विजय शिंदे, मनोज मोरे, प्रा. अमित सुब्रमण्यम, बबन पवार, विशाल चौगुले, प्रा. गुरुप्रसाद गुंजीकर, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. डी. ए. शिंदे, एस. पी. प्रभू, मिलन चव्हाण तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य, प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *