बेळगाव : वननेस योगा चॅलेंज हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, आनंद आणि एकतेचा क्रांतिकारक मार्ग आहे.
पंधरा जून पासून सात दिवसासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने जगभरातील साधकांसाठी आयोजित करण्यात आला होता. श्री प्रीताजी यांनी त्यांच्या अनुयायांना आणि लाखो साधकांना या योग प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, बेळगाव मधील योग प्रेमींसाठी वननेस ध्यानमंदिर, सदाशिवनगर येथे याचे आयोजन करण्यात आले होते.
या योगसाधनेमध्ये सहभागी प्रत्येक योगसाधकाच्या चेहऱ्यावर स्वस्थ आरोग्य आणि मनःशांती मिळाल्याचा आनंद दिसत होता.
पंधरा जूनपासून रोज संध्याकाळी साधकांनी एकत्रितपणे या वननेस योगा चॅलेंजमध्ये सहभागी होऊन हा योग सप्ताह यशस्वीपणे पार पाडला.
Belgaum Varta Belgaum Varta