बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने 27 जून रोजी मराठी परिपत्रकांसाठी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दिपक दळवी, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी उपस्थित होते.
बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळावेत यासाठी आगामी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठीत शासकीय परिपत्रके मिळावी यासाठी अनेकदा आंदोलने करून देखील कर्नाटक शासन याबाबत उदासीन आहे.
या विरोधात सोमवारी 27 जून रोजी हा मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. कॉलेज रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.
Check Also
राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत
Spread the love बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते …