बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील बसवण कुडची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळतर्फे पायी पंढरपुर दिंडी काढण्यात येत आहे. आज मंगळवार दिनांक 28 जुन 2022 रोजी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशिर्वाद घेतला व या दिंडीला जाणार्या सर्व वारकर्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदारांसमवेत नगरसेवक बसवराज मोदगेकर, डॉ. हनुमन्नावर, जोतिबा मुतगेकर, परशराम बेडका, पांडुरंग एकणेकर, देवाप्पा कडेमनी तसेच वारकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta