खानापूर (प्रतिनिधी) : शिरोली (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी महादेव राऊत यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रेमी व भाजप नेते श्रीपाद शिवोलकर उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्ष प्रिया पवार, सदस्य दत्तात्रय राऊत, अमृत गुरव, दिपक देसाई, धाकलू पाटील, धनापा नंदगडकर, महेश राऊत, अशोक मादार, सदानंद तिनेकर, सदस्या शोभा नंद्रनकर, शांता नंद्रनकर, सुनिता जांबेकर, रध्दी राऊत, अलका देसाई, सादना तिनेकर, लक्ष्मी मादार, रूपा वाडकर, सरस्वती माळगी, मलप्रभा देसाई, सुनिता झरंबळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एस. जी. गावडे यांनी केले.
प्रारंभी उपस्थित एसडीएमसी सदस्यांच्या असते दीपप्रज्वलन व फोटोचे पुुजन करण्यात आले.
यावेळी एसडीएमसीच्या अध्यक्षपदी महादेव राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महादेव राऊत यांची अध्यक्षपदी निवड होताच सर्वानी पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजप नेते श्रीपाद शिवोलकर म्हणाले की, शाळेच्या प्रगतीसाठी तसेच नवीन योजना राबविण्यासाठी नविन अध्यक्ष महादेव राऊत हे जातीने लक्ष देऊन सहकार्य करतील, त्यांना शिक्षणाची ओढ आहे. तेव्हा ते प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन समस्या सोडवतील, असे सांगितले.
यावेळी अध्यक्षपदी महादेव राऊत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी उपस्थित पाहुण्यानी केली.
कार्यक्रमाला गावचे शिक्षण प्रेमी भैरू पाटील, रमेश शिवोलकर, विजय शिवोलकर, संभाजी मांगलेकर आदी शिरोली गावचे नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एन. डी. कुंभार यांनी मानले.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …