बेळगाव : किरकोळ कारणावरून मच्छीमार तरुणाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावात घडली. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करायला गेलेल्या एका मच्छीमारावर गावातीलच काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली.
हुंच्यानट्टी येथील शंकर पाटील हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, हातांना दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. आपल्याला मराठी येत नसल्याचे सांगताच काही युवकांनी आपल्याला मारहाण केल्याचे शंकर पाटील याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, भाषेच्या वादातून हा हल्ला झाल्याचे जखमी शंकरने सांगितले असले तरी, पोलीस तपासातच या घटनेचे सत्य बाहेर येणार आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरु केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta