बेळगाव : खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्याची मोहीम पोलीस खात्याने हाती घेतली आहे. अजूनही काही गुंडांच्या घरावर धाडी टाकण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी स्पष्ट केले.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली. या कारवाईसाठी एसीपी व सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली 26 पथके स्थापन करण्यात आली होती. 8 ते 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मिळून एक पथक तयार करण्यात आले होते. या धाडसत्रात प्राणघातक शास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येणार आहे. शहरात लवकरच रौडी परेड घेण्यात येणार आहे. गुंडा कायद्यान्वये दोन गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. आणखी दोघांना लवकरच तडीपार करण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta