
बेळगाव : राज्यस्तरीय चर्म हस्त कौशल्य मेळावा आणि चर्म कौशल्य वस्तू प्रदर्शनात बेळगावच्या चर्मकार समाजातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि चर्म कौशल्य वस्तू निर्माते संतोष होंगल यांना चर्म शिल्पी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 30 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
गुणात्मक आणि उत्कृष्ट डिझाईनची पादत्राणे निर्माण केल्याबद्दल संतोष होंगल यांना पहिल्या क्रमांकाचा राज्यस्तरीय चर्मशिल्पी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकार समाज कल्याण खात्याच्या डॉ. बाबू जगजीवनराम चर्म हस्तकला कौशल्य विकास निगम (लिडकर) यांच्यावतीने बेंगळूर येथील अरमने मैदान त्रिपुरावासिनी येथे राज्यस्तरीय चर्म कुशलकर्मी मेळावा आणि चर्म कुशल वस्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात या मेळाव्याच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी संतोष होंगल यांनी उत्पादित केलेली पादत्राणे उपस्थितांसमोर सादर केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी, चर्म कौशल्य कलाकारांने बनविलेल्या उत्कृष्ट आणि गुणात्मक चर्म पादत्राणाबद्दल कौतुक केले.
संतोष होंगल यांना याआधीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta