बेळगाव : देशातील प्रत्येक कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे मिळावित, तसेच जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सर्वांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत.
यातील एक योजना अतिवाड आणि बेकिनकेरे गावांमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते येथील गावात जीवन मिशन योजनेच्या कार्याला चालना देण्यात आली.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने पावसाचा पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात व्हावा, आणि उन्हाळ्यात देखील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता या ठिकाणी जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे.
तसेच यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी गावातील युवकांना व्यायामा करिता व्यायाम शाळा उभारणीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या दोन्ही कामाकरिता निधी अपुरा पडल्यास आणखीन निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास व्यक्त केला.
तसेच ठेकेदारांनी येथील विकास कामे लवकरात लवकर करून नागरिकांच्या सेवेत ती लवकर उपलब्ध करून द्यावी अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय पाटील,
गोपाळ कामेवाडी, रवींद्र पाटील, सोमनाथ हेब्बाळकर, ग्राम पंचायत सदस्य मलाप्पा पाटील, आनंद पाटील, विद्या पाटील, जानबा मन्नूरकर, येतेश हेबाळकर, भरमा व्हारकेरी, छब्बूबाई कांबळे, बाबू कांबळे, उमेश पाटील, गंगुबाई गावडे, भावकू सावंत, राजू सावंत, बळवंत भोगण, अर्जुन डोंबले, यलापा गावडे, सुरेश सावंत, खाचू सावंत, ठेकेदार शिवाजी चलवेटकर उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …