बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे हनुमाननगर येथील धूपटेश्वर मंदिरात गाऱ्हाणे घालून बेळगाव व परिसरातील जनतेसाठी पाऊस मागण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ सल्लागार मंडळ व शेतकरी संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरवातीस उपस्थित मान्यवर व पंचमंडळीच्या हस्ते पूजा करण्यात आली. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. रणजित चव्हाण-पाटील यांनी गाऱ्हाणे घातले. प्रथेप्रमाणे बैल पळवुन भाताचे गोळे मारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार श्री. अनिल बेनके, रणजित पाटील, रमाकांत कोंडूसकर, मालोजी अष्टेकर, अनंतराव जाधव, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, गोपाळ सांबरेकर, बाबूराव कुट्रे, रमेश मोरे, दौलत मोरे, नगरसेवक शंकर पाटील, शरद पाटील, सुधीर
पाटील, नेताजीराव कटांबळे नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंग्राळ गल्लीतील शेतकरी बंधूनी आपली परंपरा टिकवून साऱ्यांना पाणी मिळावे म्हणून प्रार्थना केल्याबद्दल आमदार श्री. अनिल बेनके यांनी संघटनांचे अभिनंदन केले.