बेळगाव : श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर, येथे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शनिवार दि. 9 ते सोमवार दि. 11 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कीर्तन होईल. मागील दोन वर्षात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. यावर्षी होणार्या कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कीर्तनासाठी यशवंत बोंंद्रे पखवाजाची तर वामन वागुकर संवादिनीची साथ करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta