Thursday , March 5 2026
Breaking News

इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंचे घवघवीत यश

Spread the love

बेळगाव : इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी यांच्यावतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर, बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
खुल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अनवेकर यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, साई मंगनाईक याने 8 व्या, अक्षत शेटवाल याने 13 व्या तर सक्षम जाधव याने 15 व्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अनवेकर यांनी 5 व्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

मुलांच्या विभागात 9 वर्षाखालील वयोगटाकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत गीतेश सागेकर याने पहिला, नील मंगनाईक याने दुसरा तर अथर्व पाटील याने चौथा क्रमांक पटकावला. तसेच 11 वर्षांखालील गटात अद्वैत भट्ट याने चौथा क्रमांक पटकावला.
13 वर्षांखालील गटात साई मंगनाईक याने पहिला तर शिवु नागराज याने तिसरा क्रमांक मिळविला.
16 वर्षांखालील गटात निश्चल सखदेव याने पहिला तर अक्षत शेटवाल याने दुसरा क्रमांक मिळविला.
मुलींच्या विभागात 13 वर्षांखालील गटात वैष्णवी व्ही हिने दुसरा तर दर्शिता कुडतुरकर हिने चौथा क्रमांक तसेच 16 वर्षांखालील गटात वैभवी भट्ट हिने दुसरा तर तनिष्का हिरेमठ हिने चौथा क्रमांक पटकाविला.

या विजेत्या बुद्धीबळ पटूंना गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीचे प्रशिक्षक प्रशांत अनवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *