बेळगाव : कित्तुर मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपदनाचा फेरआढावा तसेच पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी शेतकर्यांची बैठक लवकरच होणार आहे.
नंदीहळ्ळी भागात रेल्वे मार्गासाठी सिमेंट खांब आणून टाकल्याचे समजताच शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून न घालता पर्यायी मार्गे रेल्वेमार्ग करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. यापूर्वी देखील विविध शेतकरी संघटनानी लोकप्रतिनिधींना तसेच संबंधित अधिकार्यांना भेटून निवेदन देऊन पर्यायी मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
बेळगांव-कित्तुर-धारवाड नवीन रेल्वेमार्ग हा झाडशहापूर, नंदीहळ्ळी, गर्लगुंजी व के.के. कोप्प मार्गे जाणार आहे. त्यासाठी सुपीक जमीन संपादित केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अल्पभूधारक शेतकर्यांवर यामुळे मोठे संकट ओढवणार आहे. त्यामुळे शेतकरी कायद्याच्या लढाईसोबत रस्त्यावरची लढाई लढत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta